शबनम न्यूज प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेवक तुषार कामटे यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला काल पिंपळे टिळक येथे झालेल्या जाहीर सभेत तुषार कामटे यांनी हा जाहीर प्रवेश केला आहे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपच्या सत्ता काळात झालेल्या भ्रष्टाचाराची वाचा फोडण्यास तुषार कामटे हे अग्रक्रमावर होते भाजपचे नगरसेवक असताना ही भाजपच्या गैरकारभाराला त्यांनी चव्हाट्यावर आणले होते भोसरीचे आमदार महेश लांडगे व चिंचवडचे आमदार स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात जाऊन त्यांनी आपली भूमिका मांडली होती तेव्हापासूनच ते भाजपला रामराम ठोकणार याची चर्चा होती आज त्यांनी भाजपाला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत अनेक माजी नगरसेवक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी भाजपला सोडून राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे.
माजी नगरसेवक तुषार कामठे, विजय सुतार, माजी नगरसेविका विजयाताई सुतार यांच्यासह प्रसाद कांबळे, राजन नायर, संजिवनी जगताप, रोहित मुणगेकर, मिलिंद कांबळे, आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादीसोबत विकास वाटेवर चालण्याचा निर्धार करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री शशिकांत शिंदे, माजी मंत्री राजेश टोपे, माजी आमदार विलास लांडे, अतुल लोंढे, आमदार व निरीक्षक सुनील शेळके, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे, त्यांच्या पत्नी तथा माजी नगरसेविका शीतल काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, महिलाध्यक्ष कविता आल्हाट, पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, कांग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन भोसले, रविकांत वर्पे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य निवृत्तीआण्णा बांदल, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी नगरसेवक गोरक्ष लोखंडे, बाबुराव चांदेरे, गणेश खांडगे, प्रशांत शितोळे, आरपीआयचे (खरात गट) सचिन खरात, जगदीश शेट्टी, सुलक्षणा शिलवंत, फझल शेख, संतोष कोकणे, विनोद नढे, निलेश पांढारकर, धनंजय भालेकर, सुजाता नांदगुडे, लताताई ओव्हाळ, सायली नढे, शाम जगताप, तानाजी जवळकर यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक उपस्थित होते.