शबनम न्युज | पिंपरी
शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत आज अतिक्रमण विरोधी धडक कारवाई मोहीम राबविण्यात आली. यामध्ये अतिक्रमण करणा-या हातगाड्या, टप-या, पत्राशेड/झोपडी, टेम्पो, फ्लेक्स, बॅनर आदींवर कारवाई करण्यात आली. शहरामध्ये अतिक्रमण विरोधी मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्व अधिका-यांना दिल्या होत्या. त्यानंतर आज शहरातील क्षेत्रीय कार्यालया॑तर्गत हि अतिक्रमण विरोधी धडक मोहीम महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात आली.
महानगरपालिकेच्या सर्व ८ क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिका-यांच्या नियंत्रणाखाली सर्व बीट निरीक्षक तसेच सर्व एमएसएफ जवान, पोलिस कर्मचारी आणि सर्व अतिक्रमण विरोधी पथकामार्फत हि कारवाई करण्यात आली. यामध्ये शहरातील प्रमुख तसेच वर्दळीचे रस्ते निश्चित करून तेथील पदपथ, मुख्य चौक येथे बसणारे हातगाडी, पथारीवाले, टेम्पो यांचेवर एकाच वेळी सर्व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत कारवाई करण्यात आली. दिनांक २८ आणि २९ एप्रिल रोजी देखील अशाच पद्धतीने अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिरिक आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगतिले.