उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील, शालेय शिक्षण मंत्री ना.दीपक केसरकर व क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांची उपस्थिती
पुणे दि.07-02-2024 : जे.एस.पी.एम.संचलित अराईज इंटरनॅशनल स्कूल रावेत पिंपरी चिंचवड, पुणे या स्कूलचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते 09 फेब्रूवारी 2024 रोजी सायंकाळी 04.30 वा. अराईज इंटरनॅशनल स्कूल रावेत पुणे येथे करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना.दीपक केसरकर, क्रीडा व युवक कल्याण मंत्री, बंदरे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजय बनसोडे, भोसरी मतदार संघ पुणे येथील आमदार महेशदादा लांडगे, चिंचवड मतदार संघ पुणे येथील आ.आश्विनीताई लक्ष्मण जगताप, आ.आण्णासाहेब बनसोडे, भोसरी येथील माजी आ.विलास लांडे, भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी तथा जेएसपीएम शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विलास लांडे, चाकूरचे नगराध्यक्ष कपील माकणे, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे महामंत्री अनुप मोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या अराईज इंटरनॅशनल स्कूल रावेत पिंपरी चिंचवड पुणे येथील कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष तथा भाजपा जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजितसिंह शिवाजीराव पाटील कव्हेकर, जेएसपीएमचे कार्यकारी संचालक रंजितसिंह शिवाजीराव पाटील कव्हेकर, जेएसपीएमचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार, अराईज इंटरनॅशनल स्कूल रावेत पुणे येथील प्राचार्या सौ. कानिका आंनद आदींनी केलेले आहे.