मविआची कोवर कमिटीची बैठक संपन्न
शबनम न्युज | मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोवर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे अधिक उमेदवार निवडून आणण्यावर भर दिला पाहिजे, लोकसभेपेक्षाही विधानसभा निवडणुकीत अधिक ताकद लावावी लागेल, राज्यात राष्ट्रवादी नंबर वन पक्ष ठरायला हवा, असा सूर या बैठकीत उमटला. तसेच ज्याचे ज्यादा आमदार त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे नेत्यांनी मान्य केले आहे. याच पार्श्वभूमीवर सदर बैठक पार पडली.
नवीन चेहऱ्यांना संधी तसेच तीन वर्षापेक्षा अधिक कालावधी जिल्हा व तालुकाध्यक्ष बदल करण्याची सूचना अनेक नेत्यांनी यावेळी केली. याशिवाय निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याबाबत एक मत झाले तसेच कर्नाटक सारखीच परिस्थिती महाराष्ट्रातही असून, आपण एकत्र राहिले पाहिजे, महाविकास आघाडी भक्कम ठेवायची आहे, अशी सूचना शरद पवार यांनी दिली.