शबनम न्युज | मुंबई
हिंदुत्वाच्या नावावर महाराष्ट्रात, देशात दंगली घडवण्याचे षडयंत्र सुरू आहे. सावकारांचे नाव घेऊन त्यांचा निषेध करावा, मग त्यांच्या कुटुंबीयांना भेटी द्याव्या, गोमूत्रधाऱ्यानी गोमूत्र शिंपडले ना, ते दंगलखोर आहेत, त्यांची चौकशी करा, अशी आग्रही मागणी खासदार संजय राऊत यांनी केली.
नाशिक येथील त्रंबकेश्वर मंदिरात स्थानिक दुसऱ्या धर्मीयांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने एसआयटी गठीत केली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याकरिता गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करून चौकशी आदेश दिले आहेत, यावरून आता खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. याविषयी पत्रकारांनी संजय राऊतांना विचारले. त्यावर राऊत म्हणाले की, “वीर सावरकारांसंदर्भात शिवसेनेने जी भूमिका घेतली आहे ती विज्ञानवादी आणि हिंदुत्त्ववादी होती. सावरकर विज्ञानवादी हिंदुत्ववादी होते. त्र्यंबकेश्वर मंदिरात गोमूत्र शिंपडलं. हे सावरकरांना मान्य नव्हतं. नड्डांनी या आधी निषेध करावा”, असं राऊत म्हणाले.