शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील महानगरपालिकेच्या उर्दू माध्यमांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक वर्ग खोल्या व इतर भौतिक सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात पिंपरी चिंचवड मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अखिल भाई मुजावर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका द्वारे दात मागितली होती. व वेळोवेळी पाठपुरावा केला होता, त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. या निमित्ताने अखिल भाई मुजावर आणि गुलाम मोहम्मद शेख यांचा सत्कार करण्यात आला.
अखिल भाई मुजावर आणि त्यांच्या सहकारी यांच्या सहकाऱ्यांच्या याचिकेमुळे मुंबई उच्च न्यायालयाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनास त्वरित शिक्षक भरती करण्याबाबत तसेच इतर भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. तसेच या भौतिक सुविधांचे पिंपरी चिंचवड शहरालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मोठा फायदा होणार असल्याचे यावेळी अखिल भाई मुजावर यांनी सांगितले.