शबनम न्युज | मुंबई
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देणार असल्याची चर्चा रंगली आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुषमा अंधारे यांना उमेदवारी मिळाल्यास भाजपाच्या सहयोगी खासदार नवनीत राणा आणि सुषमा अंधारे यांच्या थेट लढत होण्याची शक्यता आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात ठाकरे गटाची नुकतीच बैठक घेण्यात आली. यात विधानसभा लोकसभा निवडणुकीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. गेली अनेक वर्ष अमरावती मतदारसंघावर शिवसेनेची पकड होती. त्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपूर्ण लक्ष असल्याचे दिसून येत आहे. या बैठकीत ठाकरे गटाचे अमरावती जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्कप्रमुखांवर मोठी जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अमरावती मतदारसंघातून सुषमा अंधारे यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे.