शबनम न्युज | पिंपरी
भरधाव ट्रकच्या धडकेत एका सायकलस्वार वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना एमआयडीसी भोसरी येथे बुधवार (दि. २४) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. महादेव गोडांबा संघापुरे (वय ७५, रा. भोसरी) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
याप्रकरणी बबन महादेव सांगापुरे (वय ४५, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ट्रक चालक रमजान यासीन शेख याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील त्यांच्या सायकलवरून जात असताना, आरोपी त्यांच्या ताब्यातील टाटा ट्र्क भरधाव वेगात घेऊन आला, त्यावेळी महादेव सांगापुरे यांना पाठीमागून जोरात धडक दिली, त्यामुळे गंभीर जखमी होऊन महादेव सांगापुरे यांचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.