शबनम न्यूज | पुणे
मराठी पत्रकारिता आणि साहित्य विश्वात वेगळ्या स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक शिरीष कणेकर यांचे दुःखद निधन झाले आहे. ते 80 वर्षाचे होते. आज सकाळी त्यांची प्रकृती खालवल्यामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
कणेकर यांनी राजकारण, क्रीडा, सिनेमा अशा विषयांवर केलेले वृत्तपत्रकांमधील स्तंभलेखन लोकप्रिय झाले होते. कणेकरी, शिर्षासन आदी नावांनी त्यांचे विनोदी लेखन प्रसिद्ध झाले होते. पत्रकारिता आणि साहित्यांमधील योगदानासाठी त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
Advertisement