शबनम न्युज | मुंबई
ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना यावर्षीचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुनाथ ठाकूर यांनी दिली आहे. वहिदा रेहमान या जुन्या काळातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी देव आनंद, गुरुदत्त यांच्यासह अनेक दिग्गज अभिनेत्यांसह काम केले आहे. तसेच दुसऱ्या इनिंगमध्ये देखील चरित्र भूमिका ही मोठ्या ताकदीने साकारल्या आहेत.
विविध रंगी अभिनयाचे रंग आपल्या प्रत्येक कलाकृतीत भरणाऱ्या वहिदा रहमान यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वहिदा रहमान यांचा जन्म तामिळनाडूतल्या चेंगलपेट गावात 1938 मध्ये झाला. हे गाव आता मद्रास या शहराचे उपनगर आहे. त्यांनी त्यांची कारकीर्द तमिळ आणि तेलगू चित्रपटांपासून सुरू केली. मात्र त्यांना हिंदी चित्रपटांमधील अभिनयामुळेच त्यांना प्रसिद्धी मिळाली.
रंग दे बसंती सिनेमातल्या मिसेस राठोड असो किंवा ओम जय जगदीश सिनेमातल्या सरस्वती देवी बत्रा सगळ्याच भूमिका त्यांनी खूप ताकदीने साकारले आहेत.