शबनम न्युज | प्रतिनिधी
पुणे नवरात्रौ महोत्सव या सांस्कृतिक महोत्सवाच्या अंतर्गत महिलांच्या कलागुणांना वाव देणारा ‘पुणे नवरात्रौ महिला महोत्सव’ यंदा २४वे वर्ष साजरे करीत आहे. शिवदर्शन परिसरातील श्री लक्ष्मी माता मंदिराच्या भव्य प्रांगणात नवरात्रौच्या कालावधीत महिलांसाठी विविध स्पर्धा व उपक्रम दि. १७ ते दि. २३ ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होणार आहेत. यामध्ये वेशभुषा स्पर्धा, पाककला स्पर्धा, कन्यापूजन, श्रीसुक्त पठण, चित्रकला स्पर्धा, नृत्य स्पर्धा व महाआरती आयोजित करण्यात आली आहे. यातील नृत्य स्पर्धेसाठी १०,००० रुपये, ७००० रुपये व ५००० रुपये; पाककला स्पर्धेसाठी ५००० रुपये, ३००० रुपये, २००० रुपये व १,००० रुपये; वेशभूषा स्पर्धेसाठी शेगडी, डिनर सेट व मिक्सर; चित्रकला स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे व ट्रॉफी असणार असून प्रत्येक स्पर्धेत उत्तेजनार्थ अनेक बक्षिसे असतील. कन्यापूजनमध्ये प्रत्येक सहभागी मुलीस आकर्षक भेटवस्तू व लकी ड्रॉ आणि महाआरतीमध्ये देखील प्रत्येक महिलेस आकर्षक भेटवस्तू व ५१ लकी ड्रॉ असणार आहेत.
याचे अर्ज प्लॉट नं. १२, श्री आबा बागुल यांचे निवास स्थानासमोर, मुक्तांगण शाळेजवळ, शिवदर्शन, पुणे येथे सकाळी ११.०० ते सायं. ६.०० या वेळेत उपलब्ध असतील (७९७२७७१९३७ व ९८५०९०३५३५). महिलांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री आबा बागुल यांनी केले आहे.