शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी माजी नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीपत्र भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते देण्यात आले.
शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कार्यकारिणी जाहीर केली होती. या कार्यकारिणीचा पद वाटप कार्यक्रम मोरवाडी येथील पक्षाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात बुधवारी पार पडला.या प्रसंगी वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रवक्ते राजू दुर्गे, भाजपा शहर सरचिटणीस शीतल शिंदे, शैला मोळक, अजय पाताडे, संजय मंगोडीकर, नामदेव ढाके, मावळ विधानसभा संयोजक सदाशिव खाडे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळुराम बारणे, भाजपा युवा मोर्चाच्या शहराध्यक्ष तुषार हिंगे, शहर अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष भीमा बोबडे, महिला मोर्चाचे अध्यक्ष सुजाता पालांडे, मंडल अध्यक्ष प्रसाद कस्पटे, सोमनाथ भोंडवे, संदीप नखाते, संतोष तापकीर आदी उपस्थित होते.
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या संघनात्मक बळकटीसाठी मनीषा पवार यांच्यावर सोपविलेली जबाबदारी आपण यशस्वीरित्या पार पाडणार असल्याचा विश्वास शंकर जगताप यांनी यावेळी व्यक्त केला.