आळंदी / वार्ताहर : आळंदी मरकळ रस्त्यावरील सोळू गावच्या हद्दीतील सोळू गावाच्या पाण्याचे टाकी जवळील लक्ष्मी मेटल या कारखान्याचे जवळ विद्युत ट्रान्सफॉर्मेला अचानक लागलेल्या आगी नंतर परिसरातील नागरी वस्तीतील घरांना तसेच लगतच्या रस्त्यावरून रहदारीत असलेल्या वाहनचालकांना यावेळी झालेल्या जबरी स्फोटाचे आगीने बाधित करून परिसरात लागलेल्या आगीत अनेक वाहने , घरांचे मोठे नुकसान झाले. यात एक जण ठार झाला असून सात जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना सोळू गावात घडली आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून संबंधित ठिकाणी पोलीस, महसूल अधिकारी, स्थानिक नागरिक, महापालिका, नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ अग्निशामक वाहने पाठवून आग आटोक्यात आणली आहे.
ज्यावेळी स्फोट झाला त्यावेळी सुमारे ४ किलोमीटरवर गुरांचे लॉट दिसत होते. या प्रकरणी विद्युत वीज महावितरण कंपनीने आपली जबाबदारी झटकली असून या प्रकरणी महावितरणचा काहीही संबंध नाझल्याचे बोलले जात आहे.
लक्ष्मी मेटल या सोळूतील कंपनीचे परिसरात झालेल्या भीषण स्फोट मध्ये एका रहदारीत वाहन चालकाचा मृत्यू झाला. अजून या अपघातात अजून सात जण जखमी झाले आहेत. ही घटना पाचच्या सुमारास घडली. या घटनेचे नेमके कारण डीपी ( विद्युत रोहित्र ) की बंद असलेल्या कंपनीत स्फोट झाला हे समजू शकले नाही. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अंतर्गत आळंदी पोलीस वरिष्ठांचे मार्गदर्शनात तपास पोलीस करत आहेत. स्फोट झाल्याचे सुमारे चार किलोमीटर परिसर अचानक हादरला असून मोठं हानी टाळल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहेत. आळंदी पोलीस अधिक तपस करीत आहेत.
या संदर्भात पोलिस सूत्रांची सांगितले कि, सोलूत सोळू मध्ये अपघात झाला. भीषण स्फोट झाला आहे. रस्त्यावर उभा राहिलेल्या व्यक्ती, वाहने रहदारीत वाहने, घरे नुकसान ग्रस्त झाली आहेत. एका जण गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला असून परिसरातील घरातील, रस्त्या वरून जाणारे असे सात जण जखमी झाल्याचा अंदाज आहे. लोक वस्ती मध्ये घटना घडली आहे. जया ठिकाणी स्फोट झाला त्या परिसरात अल्युमिनियम प्लेट तयार करणारी करण्याचा कारखाना आहे. सदर कंपनी अनेक वर्ष बंद असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्या ठिकाणचे विद्युत डी .पी. वरून एका वीज जोड देण्यात आला होता. तो हि वीज बिल न भरल्याने बंद असल्याचा महावितरण चा दावा आहे. कंपनीत स्फोट होऊन डीपीस आग लागली असा अंदाज पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत. या वेळी घडलेल्या घाटाने नंतर परिसरातील रुग्ण वाहिका आणि अग्निशामक यंत्रणा तसेच सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी तात्काळ घटना स्थळास भेट देऊन मानवसेवेच्या भावनेतून मदत केली. एका व्यक्तीला मात्र या दुर्दैवी घटनेत जीव गमवावा लागला.