शबनम न्यूज, प्रतिनिधी ;
पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी चिंचवड वॉटर स्पोर्ट सेंटरचे 21 खेळाडू व केके डब्ल्यू पिंपळगाव कॉलेजचे 09 खेळाडू यांची महाराष्ट्राच्या राष्ट्रीय संघात निवड झाली आहे.
कायाकींग व कानोईंग या खेळामधील ड्रॅगन बोट इव्हेंट मध्ये एकूण 21 मुले व सात मुली या स्पर्धेसाठी पात्र ठरले असून ते आता महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत, ही स्पर्धा दिनांक 9 ते 11 फेब्रुवारी या कालावधीमध्ये भोपाळ , मध्य प्रदेश येथे पार पडणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातून उत्तमोउत्तम खेळाडू घडविण्याचा प्रयत्न पिंपरी चिंचवड वॉटर स्पोर्ट सेंटर वतीने होत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना आता मोठे यश मिळत आहे, या पिंपरी चिंचवड वॉटर स्पोर्ट चे अध्यक्ष सिद्धेश्वर बारणे यांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत तसेच अनेक स्तरातून या खेळाडूंच्या कामगिरीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.