शबनम न्युज / पिंपरी
आर्थिक दुर्बल घटकांची मदत लवकरात लवकर करावी, असे मागणीचे निवेदन शिवसेना नगरसेविका मीनल यादव यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे.
सदर निवेदनात म्हंटले आहे कि, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने गेल्या एक दीड महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवड परिसरातील दुर्बल गोरगरीब घटकांसाठी मदत करण्याची घोषणा मोठ्या थाटामाटात करण्यात आली .तसेच आपल्या महासभेत त्याला मान्यतासुद्धा घेण्यात आली .आज महिना पेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरी आपल्यावतीने कोणतीही हालचाल किंवा फॉर्म भरून घेणे अशा कोणत्याही गोष्टी होताना दिसत नाहीयेत.करोणाचा महामारीमुळे अनेक रिक्षाचालक , घरगुती मोलकरीण महिला या घरी बसून आहेत. दैनंदिन गरजा, उपजीविका करणे अवघड झाले आहे . त्यांचे अतोनात हाल होत आहे. तरी या पत्राद्वारे विनंती करते की रिक्षावाले ,मोलकरीण ,नाभिक तसेच आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना लवकरात लवकर आर्थिक मदत करावी , असे हि नगरसेविका मीनल यादव यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.