शबनम न्युज | मुंबई
म्हाडातर्फे काढलेल्या कोकण महामंडळाच्या लॉटरीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच गृहनिर्माण विभागाच्या विविध योजनांबद्दल त्यांनी माहिती दिली. म्हाडा वसाहतीतील इमारतींचा पुर्नविकास करण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांना अधिमूल्य तत्त्वावरील धोरण लागू केल्यानंतर म्हाडाला चांगला लाभ झाला आहे. जुलै २०१७ ते ऑगस्ट २०१९ या २५ महिन्यात १०३ प्रकल्प सुरु असून त्यातून ५८५ कोटी रुपये मिळाले आहेत. ऑगस्ट २०१९ ते जानेवारी २०२१ पर्यंतच्या १७ महिन्यात ६७ नवीन प्रकल्प सुरु होऊन ३३५ कोटी रुपये मिळाले आहेत. तर जानेवारी २०२१ ते ऑगस्ट २०२१ पर्यंत केवळ आठ महिन्यात नवीन १८२ प्रकल्प आणि सुरु असलेल्या १७३ प्रकल्पांमधून म्हाडाला १ हजार ११४ कोटी रुपये मिळाले आहेत. तर या पुनर्विकास प्रकल्पाच्या विकास शुल्कामधून २५० कोटींचा अतिरीक्त फायदा झाला असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारने प्रशासनाला कामकाज करण्याची मुभा दिल्यामुळे प्रशासनाने पारदर्शक आणि जलदगतीने कारभार करुन हाऊसिंग इंडस्ट्रीला वेगाने पुढे नेले असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले.