शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या पिंपरी चिंचवड शहर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आज युवा नेते पार्थ पवार यांची भेट घेतली.
पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यानंतर प्रथमच सर्व पदाधिकाऱ्यांनी युवा नेते पार्थ पवार यांची भेट घेतली. यावेळी पार्थ पवार यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. आणि नवी जबाबदारीही आपण अतिशय समर्थपणे पार पाडाल असा विश्र्वास दाखविला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर नवनियुक्त युवक शहराध्यक्ष शेखर काटे, कार्याध्यक्ष प्रसाद कोलते, तुषार ताम्हाणे, प्रसन्न डांगे उपस्थित होते.
पार्थ पवार आणि युवक पदाधिकाऱ्यांच्या भेटीत शहरातील आणि संघटनेतील विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. युवक संघटन, युवकांचे प्रश्न आदी मुद्दे यावरही चर्चा झाली. पार्थ पवार यांनीही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून शहराच्या दृष्टीने युवक संघटन मजबूत करण्याबाबत सूचना केल्या.