शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक 2 मधील जाधव वाडी, चिखली, शिव रोड, मोशी येथे सुशोभीकरणात अडथळा निर्माण करणारे अनाधिकृत नाम फलक (होल्डिंग) काढण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) उपाध्यक्ष सुनिल गंगाराम कुसाळकर यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शहराच्या वाहतुकीला आणि सुशोभीकरणाला अडथळा निर्माण करणारे सर्व अनधिकृत फलक काढून टाकावे, आणि वाहतुकीला व शहराच्या सुंदरतेला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, अनाधिकृत होल्डिंग मुळे कोणतीही जीवित हानी होऊ नये, यामुळे लवकरात लवकर अनधिकृत होर्डिंग काढण्यात यावे, जर काही जीवित हानी घडली यास पिंपरी चिंचवड महानगरपालिका व संबंधित विभाग जबाबदार असेल, तरी आपण दखल घ्यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात सुनील कुसाळकर यांनी म्हटले आहे.
सदर निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) उपाध्यक्ष सुनील कुसाळकर, वरिष्ठ उपाध्यक्ष पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी सामाजिक विभाग चंद्रकांत बोचकुरे , उपाध्यक्ष पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अनंत सुपेकर यांच्या सह्या आहेत.