शबनम न्युज | वाकड
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाकड येथे आधार दुरुस्ती शिबिर आयोजित करण्यात आले. युवा नेते आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर यांनी हा उपक्रम राबविला. २५- २७ जुलै या तीन दिवसात राबविण्यात आलेल्या शिबिरामध्ये जवळपास ४५० नागरिकांनी याचा लाभ घेतला.
या शिबिरामध्ये नवीन आधार काढणे, आधार दुरुस्ती करणे, आधार ला मोबाईल जोडणे, आधार पॅन जोडणे इत्यादी कामे करण्यात आली. सध्या वाकड आणि परिसरामध्ये आधार केंद्रे कमी असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. लहान मुलांचे नवीन आधार आणि दहा वर्ष जुने आधार अपडेट आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन विशाल वाकडकर यांनी आधार शिबिराचे आयोजन केले. लहान मुले, युवक, युवती, आणि ज्येष्ठ नागरिक यांना या शिबिराचा लाभ झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
आगामी काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणखी शिबिरे आयोजित करण्यात येतील. त्याचबरोबर नागरिकांच्या दैनंदिन जीवनात आवश्यक असणारे आधार, पॅन, आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक दाखले, आणि त्यांना पालिकेच्या इतर योजनांचा लाभ मिळवून देणार असेही विशाल वाकडकर यांनी सांगितले.