शबनम न्यूज , प्रतिनिधी :
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, ओतूर व विलासराव तांबे फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. विलासराव तांबे यांच्या १३ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ज्ञानविलास आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन ओतूर, तालुका जुन्नर जि. पुणे. या ठिकाणी करण्यात आले होते.
प्रा. डॉ. हंसराज देवराम थोरात यांच्या ४२ वर्षातील अध्ययन, अध्यापन, संशोधन व प्रशासन इत्यादी कार्याविषयीच्या योगदानाची दखल घेऊन श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने त्यांना पुणे विभागाचे शिक्षक आमदार मा.श्री. जयंत आसगावकर यांच्या शुभ हस्ते “आचार्य श्री” पुरस्कार प्रदान केला.
डॉ. हंसराज देवराम थोरात यांच्या गौरवाबद्दल श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष -मा.श्री. विशाल विलासराव तांबे, सचिव- वैभव विलासराव तांबे, खजिनदार- मयूर मुरलीधर ढमाले, प्रशासकीय सल्लागार – प्रा.राजीव पाटील, संस्थेचे सर्व प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर सहकाऱ्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. माणिक कसाब यांनी दिली.