शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील केशवनगर परिसरातील मधुकर बच्चे युवा मंच व चैतन्य ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी जेष्ठ नागरिकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यानंतर शिव वंदना करण्यात आली.
याप्रसंगी मधुकर बच्चे युवा मंच व चैतन्य ग्रुप यांच्या वतीने शिवजयंती निमित्त हिंदू जनजागरण समितीच्या सेवाकार्यास शिवभक्तांच्या उपस्थितीत औषधे सुपूर्द करण्यात आली.
या वेळी महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे,गणेश बच्चे,पंढरीनाथ बरीदे, पोपट बच्चे,संजय मोकाशी,शरद देशपांडे, रोहिणी बच्चे,अक्षय गारगोटे ,मच्छिन्द्रनाथ थोरवे,अर्चना बच्चे,काजल बच्चे,उत्तम विटुळे, सखाराम देशपांडे,श्रावणी बच्चे,असावरी बच्चे आदी पदाधिकारी,जेष्ठ नागरिक,व अनेक शिवभक्त उपस्थित होते.
मधुकर बच्चे युवा मंच वतीने हिंदू जनजागृती संस्थेस औषधे सेवा दिल्याबद्दल सर्वांनी कौतुक करून बच्चे यांना धन्यवाद दिले
महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे यांनी उपस्थिताचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्थाविक केले. तर चैतन्य ग्रुपचे गणेश बच्चे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. उपस्थित सर्वांना प्रसाद वाटपही करण्यात आले.या वेळी सर्वांनी जय शिवाजी जय भवानी घोषणा देऊन परिसरात भगवे वातावरण तयार झाले होते.