शबनम न्युज | पिंपरी
विद्या विनय निकेतन बालनाट्य स्पर्धेमध्ये (इंग्रजी माध्यम) पिंपरी चिंचवड विभागात प्रथम तर पुणे जिल्हास्तरीय ला द्वितीय तसेच विद्या विनय निकेतन (मराठी माध्यम) समूहगीत स्पर्धेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आयोजित केलेल्या 36 संघातून तिसरा क्रमांक पटकावला.
‘शिक्षणाने मनुष्य घडतो व त्याच्यातील कला गुणांचा विकास म्हणजे सर्वांगीण शिक्षण होय! पुणे जिल्हा परिषद आणि डायट यांच्या संयुक्त विद्यामानाने घेण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण आंतर शालेय नाट्यस्पर्धेमध्ये विद्या विनय निकेतन इंग्रजी माध्यम या विद्यालयातील सात विद्यार्थ्यांनी नवस हे बालनाट्य सादर केले त्यापैकी चार मुलांना उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले व उत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार संगीत शिक्षिका सौ.कल्पना गजरे यांना मिळाला तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आयोजित केलेल्या 36 संघातून विद्या विनय निकेतन मराठी माध्यम विद्यार्थिनींनी तृतीय क्रमांक पटकावला या स्पर्धेसाठी मार्गदर्शन मा.आरती ताई चोंधे यांचे मिळाले व सहकार्य मा. मुख्याध्यापिका सौ श्रीजा नायर (इंग्रजी माध्यम) सौ.नूतन भांबुरे (मराठी माध्यम) व शिक्षिका शिल्पा कांबळे यांचे मिळाले.