शबनम न्युज | मावळ
लोकसभेत महाविकास आघाडी कडून कोणाला किती जागा मिळणार? या गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही. पण, आज ठाकरे गटाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. संजय राऊत यांनी याबद्दलचे पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. त्यात महाराष्ट्रात एकूण 16 जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांच्यासह महाराष्ट्रात 16 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. यामध्ये “हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे. मुंबई दक्षिण मध्य श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून १७ नावं जाहीर
१) नरेंद्र खेडकर-बुलढाणा
२) संजय देशमुख-यवतमाळ-वाशिम
३) संजोग वाघेरे पाटील-मावळ
४) चंद्रहार पाटील-सांगली
५) नागेश आष्टिकर-हिंगोली
६) चंद्रकांत खैरे-छत्रपती संभाजी नगर
७) ओमराजे निंबाळकर-धाराशिव
८) भाऊसाहेब वाघचौरे-शिर्डी
९) राजाभाऊ वाजे-नाशिक
१०) अनंत गीते-रायगड
११) विनायक राऊत-सिंधुदुर्ग, रत्नागिरी<br>१२) राजन विचारे-ठाणे
१३) अनिल देसाई- मुंबई दक्षिण मध्य
१४) संजय दिना पाटील-मुंबई ईशान्य
१५) अरविंद सावंत-मुंबई दक्षिण
१६) अमोल किर्तीकर-मुंबई वायव्य
१७) संजय जाधव-परभणी