शबनम न्युज | पुणे
पुण्याचे माजी महापौर आबा पागुल यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. काँग्रेसने धंगेकरांना उमेदवारी दिल्यानंतर आबा बागुल नाराज होते. त्यांनी पुण्यातील काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर आंदोलनही केले होते. तेव्हापासून आबा बागुल भाजपात जाणार किंवा भाजप नेत्यांचे संपर्कात असल्याचे बोलले जात होते. त्यांच्या आजच्या भेटीला जसे पूर्णविराम मिळालेले आहे .आज बागुल यांनी फडणवीस आणि बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर आबा बागुल भाजपात प्रवेश करणार? अशा चर्चा रंगत आहे.
पुण्याची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निष्ठावंत लोकांना धक्का बसला आहे. त्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा आहे, खरंतर ही निष्ठावंत लोकांची हत्या म्हणायला पाहिजे. 40 वर्ष काम करणाऱ्यांना तिकीट दिलं नाही, आत्ता आलेले आमदार त्यांना तिकीट दिलं गेलं. ते शिवसेनेतून मनसेत गेले तिथून काँग्रेसमध्ये आले. कसबा पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली, त्यांना आम्ही पक्षाने मेहनत करून निवडून आणलं. आता लोकसभेसाठी बाळासाहेब शिवलकर, मोहन जोशी, उल्हास पवार ,मी असे अनेक कार्यकर्ते असताना पक्षाने काय निकष लावून धंगेकरांना तिकीट दिले माहित नाही, असे विधान बागुल यांनी केले होते. मात्र आज त्यांच्या या भेटीदरम्यान प्रवेशाची चर्चा झाली की नाही हे पाहणे उत्सुकाचे ठरणार आहे