शबनम न्युज | पुणे
आरटीई पोर्टलवर चार ते पाच वेळा मुदतवाढ देऊन शाळा नोंदणी सह रिक्त जागांची आकडेवारी अद्यावत केल्यानंतर अखेर ऑनलाइन प्रवेश अर्जासाठी राज्य शासनाला मुहूर्त मिळाला आहे. आरटीई अंतर्गत रिक्त असलेल्या पंचवीस टक्के आरक्षण जागांवर प्रवेशासाठी आज दिनांक 16 एप्रिल पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. आरटीई पोर्टलवर शाळाची नोंदणी पार पाडल्यानंतर
आरटीई कायद्यांतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास घटकांकरिता 25% रिक्त जागांवर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करण्यास सुरुवात होते. यंदा प्रवेश प्रक्रियेला दोन महिने उशिराने सुरुवात झाली आहे, त्यात दीड महिना शाळांची नोंदणी करण्यात गेला आहे. आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी पुणे जिल्ह्यातील 5153 शाळा नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये 77 हजार 927 जागा रिक्त आहेत. राज्यात 75 हजार 974 शाळांनी आरटीई पोर्टलवर नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये आरटीई अंतर्गत 25% रिक्त असल्याने लाख 72 हजार 823 जागा अद्ययावत केल्या आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे.