शबनम न्युज | पुणे
देहू नगरपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी बॅनर होर्डिंग दुकानासमोर जाहिराती लावल्या जात होत्या. परंतु यापुढे अशा जाहिरातींवर देहू नगरपंचायत वतीने दिलेल्या ठिकाणी आणि नगरपंचायतीने जे दर दिले आहे, त्यानुसार दर आकारणी होणार आहे.
नगरपंचायतीने ठरवून दिल्यानुसार बॅनर होर्डिंग लावावे लागणार आहे. त्यावर क्यूआर कोड सोबत जाहिरात दराचे नाव, मुदत, प्रिंटिंग प्रेस चे नाव यांचा यामध्ये समावेश असणार आहे. तसेच महापुरुषांची जयंती, दशक्रिया विधी, जाहिरात, बॅनर साठी जाहिरात फलकाची मर्यादा असणार आहे. असा ठराव देहू नगरपंचायतीच्या वतीने सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे.
देहूगाव नगरपंचायतीच्या मुख्य अधिकारी निवेदिता घार्गे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. या बैठकीला नगराध्यक्ष पूजा दिवटे, उपाध्यक्ष सुधीर काळोखे तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.