शबनम न्युज | बारामती
काही वडीलधारी जुना काळ आठवत असतील, तर त्यांना म्हणा की जुना काळ बाजूला ठेवा, आता नवीन काळ पहा. सासूचे चार दिवस संपले, आता सुनेचे चार दिवस येऊ द्या, नुसते सासू.. सासू मग सुनेने काय नुसते बघत बसायचे का? असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना सुनावले आहे. त्यांची बारामती येथे सभा पार पडली. त्यावेळेस ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “काही वडीलधारे जुना काळ आठवत असतील तर त्यांना म्हणा की जुना काळ बाजूला ठेवा, आता नवीन काळ पाहा. सासूचे चार दिवस संपले आता सुनेचे चार दिवस येवूद्या. नुसते सासू सासू…मग सुनेने काय नुसते बघत बसायचे का? आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे पाहतो. मग ४० वर्ष झाले तरी बाहेरची कशी? किती वर्ष झाल्यावर या घरची ते सांगा?”, असा टोला अजित पवार यांनी नाव न घेता शरद पवार यांना लगावला.
“मी एक वेगळी भूमिका घेतली. मी एकटा नाही तर प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील आणि ८० टक्के पेक्षा जास्त आमदारांनी ही भूमिका स्वीकारली. याचे कारण आपले प्रश्न सुटावे. गेल्या १२ वर्षात केंद्र सरकारचा बारामती मतदारसंघात निधी आलेला नाही”, असे म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला.