शबनम न्युज | शिरूर
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, चिखलगाव, ता. खेड येथील मारुती महादेव मंदिर परिसरात कार्यकर्ता मेळाव्याचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात शिवाजी आढळराव पाटील यांचे स्वागत केले. महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवत मेळाव्याला उत्तम प्रतिसाद दिला. महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार समस्त उपस्थितांनी यावेळी केला.
या प्रसंगी, आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस खेड तालुकाध्यक्ष कैलासराव सांडभोर, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे निर्मलाताई पानसरे, भाजपा तालुकाध्यक्ष शांताराम भोसले,जिल्हाध्यक्ष सहकार आघाडी भाजपा शेखर शेटे, पुणे जिल्हापरिषद मा.उपाध्यक्ष अरुण गिरे, शिवसेना तालुकाप्रमुख राजुशेठ जवळेकर, संचालक कात्रज दूध संघाचे संचालक अरुण शेठ चांभारे, कात्रज दूध संघाच्या संचालिका लताताई गोपाळे, पं.स.खेड मा. सभापती विलास कातोरे, कृषी उत्पन्न बाजार समिती मा. सभापती नवनाथ होले, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कैलास लिंभोरे, शिवसेना मा. उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हनुमंत कड, माजी सभापती पं.स. खेड, पश्चिम विभाग अध्यक्ष सुजाताताई पचपिंड, महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा संध्याताई जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका नंदाताई कड, पं.विभाग रा काँ पा अध्यक्ष नामदेव गोपाळे, महिला मोर्चा अध्यक्ष कल्पना गवारी, भाजपा तालुका सरचिटणीस अक्षय पऱ्हाड, भाजपा संपर्क प्रमुख भगवान मेदनकर, भाजपा कार्याध्यक्ष प्रितम शिंदे, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष रवींद्र वाडेकर, युवा मोर्चा अध्यक्ष संदेश जाधव, सहकार आघाडी अध्यक्ष अनिल सोणवणे, चिटणीस निखिल सांडभोर, शहर उपाध्यक्ष निर्मला कवडे, शहर उपाध्यक्ष अमिना पावसे, युवा मोर्चा सरचिटणीस नसीम पठाण, वाहतुक आघाडी योगेश देशमुख, पदवीधर संयोजक प्रणव केदारी, शहराध्यक्ष राजगुरुनगर राष्ट्रवादी सुभाष होले, युवक अध्यक्ष जयसिंग दरेकर, विद्यार्थी अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, शहराध्यक्ष युवक सागर सातकर, विभाग शहर अध्यक्ष पप्पु बनसोडे, युवक शहर अध्यक्ष सौरभ गव्हाणे, सरचिटणीस उल्हास कुडेकर, उपाध्यक्ष वैभव नाइकडे, माजी युवक अध्यक्ष विजेश कांबले, सैनिक सेल अध्यक्ष पुणे वैशाली पवले, महिला अध्यक्ष कांचनताई सुर्यवंशी, शिवसेना शेतकरी नेते मारुती चिमाजी सातकर, शहर उपाध्यक्ष निर्मला कवडे, शहर उपाध्यक्ष अमिना पावसे, सांस्कृतिक आघाडी शिंगाडे सर, तालुका विस्तारक ओंकार सोनार, तालुका उपाध्यक्ष सरपंच नितीन गाडे, तालुका उपाध्यक्ष सरपंच दत्तात्रय सुतार, माजी सरपंच चिखलगाव बालासाहेब गोपाले, सरपंच चिखलगाव शोभाताई गोपाले, सरचिटणीस रा. का. खेड लक्ष्मणराव खेड, माजी सरपंच चिखलगाव दत्तात्रय सुर्यवंशी व राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा व महायुतीचे घटक पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.