शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पुणे:- छत्रपती संभाजीनगर येथे कृतज्ञता पुरस्कार,२०२३ ने लेखिका, कवयित्री, शिक्षिका सौ.प्रतिमा अरुण काळे यांचा सन्मान.सोहळा रविवार दिनांक १९/११/२०२३ रोजी संपन्न झाला
महसूल सभागृह,छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या दिमाखात राजेशाही शिवशाही समूह व महाराष्ट्र साहित्य दर्पण आयोजित बाप माणूस मा.चंद्रकांतदादा वानखेडे यांच्या वाढदिवसानिमित्त दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन व कृतज्ञता पुरस्कार सोहळा,२०२३ मोठ्या दिमाखात संमेलन अध्यक्ष मां.चंद्रकांत दादा वानखेडे,स्वागताध्यक्ष मा.शैलेंद्र भणगे सर,राजेश्री शिवशाही समूह अध्यक्ष,गणेश दादा चव्हाण,विलास ठोसर सर, प्रकाश पाठक सर,सचिन शिंदे सर,भैरवनाथ कानडे सर,अर्जुन नोटके सर तसेच अनेक मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाला.
सामाजिक स्तरावर कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार,२०२३ देवून गौरविण्यात आले.यात निगडी प्राधिकरण पुणे,४४ येथील लेखिका, कवयित्री,शिक्षिका सौ.प्रतिमा अरुण काळे यांना ही मा.चंद्रकांत दादा वानखेडे व गणेश दादा चव्हाण,डॉ. प्रा .शैलेंद्र दादा भणगे तसेच मंचावरील मान्यवरांच्या हस्ते कृतज्ञता पुरस्कार,२०२३ देवून गौरविण्यात आले.