शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड – रस्त्याचे निकृष्ट दर्जाच्या काँक्रिटीकरण करणाऱ्या ठेकेदारावर कडक कारवाई करा अशी मागणी शिवसेनेचे युवा नेते निखिल दळवी यांनी केलीय. निवेदनात नमूद केले आहे कि शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील गंगानगर येथील रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करण काम सुरू आहे सदर रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे महानगपालिकेने दिलेल्या नियमाचे पालन न करता स्वतःच्या फायद्यासाठी सदर काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे सदर काँक्रिटीकरांच्या कामांमध्ये या कामाचे कॉन्ट्रॅक्टर व मनपा अधिकारी यांच्यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही सदर कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय आम्हाला आहे मागील ५ वर्षापासून सदर रस्त्याचे काँक्रीटकरण करण्याचे काम सुरू आहे ५ वर्ष उलटूनही रस्त्याचे काँक्रिटीकरण करणाऱ्या कामाचे कॉन्ट्रॅक्टर सदर काँक्रिटीकरण करण्याचे काम पूर्ण करू शकले नाही त्यामुळे गंगानगर मधील स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे रस्ता तीन-तीन महिने बंद करून ठेवणे जेसीबी ट्रक रस्त्यामध्ये कुठेही लावणे कोठेही दोन दोन महिने खड्डे करून ठेवणे कामाचे साहित्य ब्लॉक नागरिकांच्या दारासमोर ठेवणे सहा सहा महिने साहित्य नागरिकांच्या दारातून न हटवणे स्थानिक नागरिकांना मनपा अधिकारांमार्फत दादागिरी करणे आणि अरे रावी ची भाषा करणे असा सर्व त्रास गंगानगर मधील स्थानिक नागरिकांना कॉन्ट्रॅक्टर व महानगरपालिका अधिकारी यांच्याकडून गेले ५ वर्षापासून देण्यात आला आहे गंगानगर परिसरातील स्थानिक रहिवासी नागरिकांनी आमच्या कडे सदर रस्त्याच्या कामाच्या तक्रारी केल्या आहेत त्याप्रमाणे खालील गंभीर स्वरूपाचे आम्ही आपणास खालील प्रमाणे मुद्दे मांडत आहोत
महत्त्वाचे मुद्दे
१) गंगानगर मधील सुरू असलेल्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे काम मनपाने दिलेल्या निकषाला नियमाला धरून योग्य पद्धतीने सुरू आहे का झाले आहे का याची संपूर्ण सखोल चौकशी करावी
२) सदर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम करण्यासाठी महानगरपालिकेने काम सुरू करणे वेळी कॉन्ट्रॅक्टर यांना ३ वर्षाचा कालावधी दिला होता या कालावधीमध्ये सदर कामाचे कॉन्ट्रॅक्टर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम पूर्ण करू शकले नाही कामाची ३ वर्ष मुदत संपल्यानंतर पुन्हा महानगरपालिकेने कॉन्ट्रॅक्टर यांना काम पूर्ण करण्यासाठी ६ महिन्याची मुदत वाढ दिली त्या ६ महिन्यात देखील सदर कॉन्ट्रॅक्टर काम पूर्ण करू शकले नाही महानगरपालिकेने पुन्हा सदर कॉन्ट्रॅक्टर यांना ६ महिने मुदतवाढ काम पूर्ण करण्यासाठी दिली काम करण्यासाठी पहिले ३ वर्ष नंतर २ वेळा ६ व ६ महिने एकूण १२ महिने मुदतवाढ देऊनही सदर कॉन्ट्रॅक्टर सदर काँक्रिटीकरण करण्याचे काम पूर्ण करू शकले नाही ५ वर्ष उलटून ही कॉन्ट्रॅक्टर सदर काँक्रिटीकरण करण्याचे काम पूर्ण करू शकले नाही सद्यस्थितीला महानगपालिकेने काम पूर्ण करण्यासाठी दिलेली मुदत संपली आहे तर कोणाच्या आशीर्वादाने अनधिकृतपणे सदर काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे आमच्या माहितीनुसार कॉन्ट्रॅक्टर यांना रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचा अनुभव नसल्याकारणाने सदर काम वेळेत पूर्ण करू शकले नाही महानगरपालिकेच्या नियमानुसार सदर कॉन्ट्रॅक्टरला दंड लावून कठोर कारवाई करावी सदर कॉन्ट्रॅक्टरचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करावे
३) सदर काम पाहता ज्या ठिकाणी रस्त्याच्या मधी काँक्रीट करायचे आहे त्या ठिकाणी पिवर ब्लॉक लावून स्वतःच्या फायद्यासाठी पैसे वाचवण्याचे काम कॉन्ट्रॅक्टर यांचा कडून करण्यात आले आहे याची चौकशी करावी
४) मनपा नियमानुसार रस्त्याच्या बाजूला ७ फुट फुटपाथ पेवर ब्लॉक लावून तयार करावे असा मनपाने दिलेल्या नियमानुसार टेंडर कॉपीमध्ये उल्लेख आहे सदर कामाच्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरने स्वतःच्या फायद्यासाठी पैसे वाचवण्यासाठी ज्या ठिकाणी ७ फुटाचे फुटपाथ तयार करायचे आहे त्या ठिकाणी ३ ते ४ फुटाचे फुटपाथ तयार केले आहे याचेही चौकशी करावी
५) सदर काँक्रिटीकरण करण्याचे काम करताना कॉन्ट्रॅक्टरने संपूर्ण रस्त्याच्या खाली स्ट्रॉंम वॉटर लाईन व ड्रेनेज लाईन याचे सर्व पाईप लाईन चेंबर चेंबरची झाकणे हे सर्व साहित्य नवीन वापरले आहे का नाही याची चौकशी करावी.
६) सदर ठिकाणी काम सुरू असताना काम व्यवस्थित सुरू आहे का याची पाहणी करण्याकरता महानगरपालिका अधिकारी सदर कामाच्या ठिकाणी उपस्थित राहणे बंधनकारक आहे तरी ही महानगरपालिकेचे अधिकारी काम सुरू असताना कामाच्या ठिकाणी उपस्थित नसायचे असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे कॉन्ट्रॅक्टर यांना मदत करण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपले डोळे झाकून ठेवले होते जेणेकरून कॉन्ट्रॅक्टर आपल्या फायद्यासाठी व पैसे वाचवण्या साठी काँक्रिटीकरण करण्याच्या कामामध्ये कमी दर्जाचे साहित्य वापरता येईल व निकृष्ट दर्जाचे काम करता येईल सदर काँक्रिटीकरण कामा संदर्भात संबंधित असलेले ठेकेदार व महानगरपालिका अधिकारी यांच्यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे असा आमचा आरोप आहे तरी संबंधित ठेकेदार व महानगरपालिका अधिकारी यांची खातेनिहाय सखोल चौकशी करावी
७) सदर काँक्रिटीकरण करण्यावेळी मनपाने दिलेल्या नियमानुसार सिमेंट काँक्रीट मध्ये स्टील लोखंडी रॉड मनपाने दिलेल्या मोजमापाप्रमाणे वापरण्यात आले आहे का याची चौकशी करावी
८) सदर कामाचे सिमेंट काँक्रिटीकरण स्लॅप ची साईज मोज माप आमच्या माहितीनुसार कमी आहे स्वतःच्या फायद्यासाठी कॉन्ट्रॅक्टरने सदर कामांमध्ये वापरण्यात आलेले सिमेंट हे कमी दर्जाचे आहे अशी आमचे माहिती आहे याची सखोल चौकशी करावी
मा. आयुक्त साहेब
आम्ही आपणास हे सर्व मुद्दे निदर्शनास आणून दिले आहे सदर ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे तरी आपण सदर ठेकेदार व संबंधित महानगरपालिका अधिकारी यांची सखोल चौकशी करून कडक कारवाई करावी अशी प्रभाग क्रमांक १५ गंगानगर मधील स्थानिक रहिवाशी नागरिकांची मागणी आहे स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार आमच्या वतीने आपणास तक्रार निवेदन देत आहे
केलेल्या तक्रारीवर आपणाकडून कोणतीही दखल न घेतल्यास व संबंधित ठेकेदार व मनपा अधिकारी यांच्यावर कारवाई न केल्यास आम्ही महानगरपालिके विरोधात न्यायालयात दाद मागण्यासाठी जनहितार्थ याचिका दाखल करणार आहोत याची ही आपण गंभीर नोंद घ्यावी असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.