शबनम न्युज | पुणे
पुण्यात पीएमपी बस मध्ये चढताना अचानक दरवाजा बंद झाल्याने एका महिलेचा चाकाखाली येऊन मृत्यू झाला आहे. महिला ही बस मध्ये चढत असताना अचानक दरवाजा बंद झाला आणि महिला चाकेखाली येऊन गंभीर जखमी झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना 12 एप्रिल रोजी दांडेकर तुला जवळील पीएमपी स्थानकावर घडली. बसचे चाक पायावरून गेल्याने प्रवासी महिला जखमी झाली आणि त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
काशीबाई पांडुरंग खुरंगळे (वय ६०, रा. धायरी) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मल्हारी पांडुरंग खुरंगळे (वय ३१) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बस चालक दिलीपराव वामनराव लहाने (वय ५०, रा. मांजरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मल्हारी खुरंगळे हे आई-वडील मुलासह धायरी परिसरात राहायला आहेत. मृत काशीबाई खुरंगळे या राजेंद्र नगर मध्ये राहणाऱ्या मुलीकडे आल्या होत्या. फिर्यादी मल्हारी खुरंगळे हे आई-वडिलांना परत घरी घेऊन जाण्यासाठी आले आणि दांडेकर पोलीस येथील पेट्रोल पंपाजवळ येईल पीएमपी स्थानकावर धायरीकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत होते. थोड्या वेळात धायरी डीएसके विश्व जाणारी पीएमपी आली काशीबाई यांचे वय अधिक असल्याने त्यांना बसमध्ये चढतायेत नव्हते. फिर्यादी मल्हारी खुरंगळे हे बहिणीच्या मदतीने आईला बसच्या पाठीमागील दरवाजातून चढवत होते. अचानक बसचा दरवाजा बंद झाला आणि बस पुढे निघाली यामुळे काशीबाई खाली पडल्या आणि त्यांच्या डाव्या पायावरून बसचे चाक गेले. पायाचा चेंदामेढा झाला, उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. यानंतर उपचारासाठी काशीबाई यांना रुग्णालयात नेले असता, उपचारादरम्यान त्यांचे 14 एप्रिल रोजी निधन झाले. पीएमपी चालकाने हायगईने, बेदरकारपणे बस चालवल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. याबाबत अधिक तपास पर्वती पोलीस करीत आहेत.