शबनम न्युज | पुणे
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज फुरसुंगी भागात नागरीकांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला. या दौऱ्यादरम्यान सुनेत्रा पवार यांनी फुरसुंगी येथे प्रभू श्रीराम जन्म सोहळ्यात सहभाग घेतला.
फुरसुंगी येथील संगमरवरात उभारलेल्या महादेव मंदिरात हा जन्मोत्सव सोहळा पार पडला.. या रामनवमीनिमित्त आयोजित किर्तनानंतर फुलांची उधळण करत राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.. पाळणा म्हणत सुनेत्रा पवार याही उत्सवात सहभागी झाल्या.. यावेळी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते श्रीरामाची आरती करण्यात आली.
यावेळी बाबाराजे जाधवराव, दिगंबर दुर्गाडे, गणेश ढोरे, संदीप आरफळे, सुरेश घुले, सनी मानकर, स्नेहल दगडे, मोनिका हरगुडे, प्राची देशमुख, केशवतात्या कामठे, धनंजय कामठे, आकाश पवार, ज्ञानेश्वर कामठे, राहुल चोरघडे, बाजीराव सायकर, संदीप पवार, सुनीता धर्माधिकारी, रंजना वेदपाठक, अंकुश लांडगे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व सोहळ्यात नितीन शिंदे यांच्या चौघडा वादनाने वातावरण मंगलमय झाले होते.