शबनम न्युज | पुणे
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.दिपक सिंगला, ३३ मावळ लोकसभा मतदारसंघ आणि मा.सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.विठ्ठल जोशी, २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय – औंध, पुणे येथे मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा रुग्णालय शल्य चिकित्सक डॉ.श्रीनिवास कोलोड, स्त्री रोग तज्ञ डॉ. कोरे व २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ स्वीप टिमचे नोडल अधिकारी श्री.राजाराम सरगर व स्वीप व्यवस्थापन टीम यावेळी उपस्थित राहून संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती करण्यात आली.
जिल्हा रुग्णालय – औंध, पुणे येथील डॉ.श्रीनिवास कोलोड, स्त्री रोग तज्ञ डॉ. कोरे व तेथे जमलेल्या मतदार नागरिक यांना निवडणुकीत मतदान करण्या संदर्भात मतदान जनजागृती करण्यात आली. यानंतर यांचेकडून मतदान प्रतिज्ञा म्हणून घेणेत आली.