शबनम न्युज | पिंपरी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मा.निवडणूक निर्णय अधिकारी दिपक सिंगला, ३३ मावळ लोकसभा मतदारसंघ आणि मा.सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.विठ्ठल जोशी, २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ यांचे मार्गदर्शनाखाली शहीद अशोक मारुतीराव कामटे स्पर्धा परीक्षा केंद्र – सांगवी येथे मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी अभ्यासिकेचे व्यवस्थापक श्रीम. डमाळे व श्री.सचिन माने व तसेच २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ स्वीप टिमचे नोडल अधिकारी श्री राजाराम सरगर व स्वीप व्यवस्थापन टीम यावेळी उपस्थित राहून संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती करण्यात आली.
शहीद अशोक मारुतीराव कामटे स्पर्धा परीक्षा केंद्र सांगवी येथील अभ्यासिकेचे व्यवस्थापक श्रीम.डमाळे व श्री.सचिन माने व स्पर्धापरिक्षाची तयारी करणारे विद्यार्थी यांच्याकडून विहित नमुन्यातील संकल्पपत्र भरून घेऊन निवडणुकीत मतदान करण्या संदर्भात मतदान जनजागृती करण्यात आली. यामध्ये उच्चशिक्षण घेत असलेल्या मुले/मुली मतदारांना मतदान करण्यासाठी एक उत्साह मिळाला तसेच “देश हितासाठी मतदान करा, मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, वोट देणे जाना है देश को आगे बढाना है” असा संदेश देण्यात आला. यानंतर विद्यार्थी आणि शिक्षक यांचेकडून मतदान प्रतिज्ञा म्हणून घेणेत आली.