शबनम न्युज | पुणे
तुमच्या नावाने मुंबईवरून पाठवलेल्या पार्सल मध्ये अमली पदार्थ सापडल्याचे सांगून सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. क्रमांकावरून आलेल्या फोनवर कुरियर ऑफिस मधून आणि नंतर मुंबईहून सायबर डीसीपी बोलत असल्याचे सांगत तरुणीला 23 लाखांचा गंडा घातला गेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 28 फेब्रुवारी रोजी घडला आहे. याबाबत वडगाव शेरी परिसरात राहणाऱ्या एका 29 वर्षे तरुणीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तुमच्या नावाने मुंबईतून तैवानला पार्सल पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये अडीचशे ग्रॅम ड्रग्स आहेत. तसेच लॅपटॉप, पासपोर्ट असा मुद्देमाल आहे. तुम्हाला कारवाई टाळायची असेल तर लगेच सायबर सेलला तक्रार करा, तुमचा कॉल मुंबई येथे सायबर सेलला जोडून देतो, सांगून डीसीबी बोलत असल्यास बनाव केला. तुमचे आधार कार्ड दहशतवादामध्ये वापरले गेले आहे. खातेवेळी फाय करण्यासाठी एक लिंक पाठवली त्यावर तुमच्या बँक खात्यातील सर्व रक्कम आमच्या बँक खात्यावर पाठवा त्याची चौकशी करून आम्ही तुम्हाला ती परत पाठवतो, असे सांगत चोरट्याने सांगितल्याप्रमाणे तरुणीने एकूण 22 लाख 95 हजार रुपये पाठवले या प्रकरणी अज्ञात मोबाईल धारकाच्या विरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.