शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील नागेश्वर नगर, इंद्रायणी पार्क, गायकवाड वस्ती, स्वामी समर्थ, गणेश नगर, तुपे वस्ती या भागात विजेचा मोठा प्रश्न नागरिकांना सतावत होता. मागील गेल्या दोन वर्षांपासून या प्रभागातील भाजप नगरसेवक वसंत बोराटे हे सातत्याने प्रयत्न करत होते. महावितरण विभागाकडून वीज पुरवठा सुरळीत होण्याकरिता डीपी बसविण्याची मागणी वसंत बोराटे यांनी केली होती. त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
प्रभागातील याभागात महावितरण विभागाकडून 100 के डब्ल्यू डी पी बसविण्यात येत आहे याबाबत नगरसेवक वसंत बोराडे यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की, आपल्या प्रभागातील नागरिकांना विजेच्या अडचणींना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत होते. मी गेली दोन वर्षापासून महावितरण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला त्यानुसार, आज प्रभागात या विजेचा प्रलंबित प्रश्न सोडविता आला. मी नेहमीच नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी कायम तत्पर राहणार यानिमित्ताने प्रभागातील नागरिक, ज्येष्ठ महिला तसेच नोकरदार वर्ग यांनी यावेळी नगरसेवक वसंत बराटे यांचे आभार व्यक्त केले.