शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय लॉन टेनिस स्पर्धा सन 2023-24 दि 28/8/2023 ते 2/9/2023 अखेर लॉन टेनिस कोर्ट डॉ हेडगेवार भवन आकुर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
सदर स्पर्धेत 100 शाळा सहभागी झाल्या आहेत.14 वर्षा खालील मुले मुली, 17वर्षा खालील मुले मुली, 19वर्षा खालील मुले मुली यामध्ये सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा विभागाचे प्रशासन अधिकारी श्री. परशुराम वाघमोडे यांच्या हस्ते दिनांक 28/8/2023 रोजी सकाळी 10 वाजता झाले. या प्रसंगी क्रीडा पर्यवेक्षक श्री. गोरक्ष तिकोने. पंचप्रमुख श्री. सरदारसिंह ठाकूर. क्रीडाशिक्षक दादाभाऊ होलगुंडे, दिपक जगताप. पंच श्वेता ठाकुर , भक्ती भापकर, चंद्रकांत पोटघन, अक्षय बोईरे उपस्थित होते.
१९ वर्षाखालील मुलांचा अंतिम निकाल खालील प्रमाणे.
प्रथम : सौरभ कोद्रे (श्री. फत्तेचंद जैन विद्यालय)वि. वि (१२-१०) प्रियांश कांसरा ( इल्प्रो इंटरनॅशनल स्कूल )
द्वितीय :प्रियांश कांसरा ( इल्प्रो इंटरनॅशनल स्कूल )
तृतीय : विश्वा जोंधळे ( विद्या व्हॅली नोर्थपॉइंट ज्युनिअर कॉलेज )
चौथा : प्रवीण चौधरी ( सिटी प्राइड ज्युनिअर कॉलेज )
पाचवा : सोहम भावे ( सी.एम.एस.इंग्लिश मिडीयम हायर सेकंडरी स्कूल )