शबनम न्युज | पिंपरी
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना आज (दि. 19) पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला.
पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने उमेदवार संजोग वाघरे पाटील यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संपर्कप्रमुख तथा आमदार सचिन आहिर यांनी एबी फॉर्म सुपूर्त केला. या वेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पुणे जिल्हाप्रमुख माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, मावळ लोकसभा प्रचार प्रमुख योगेश बाबर, रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते बबनदादा पवार आदी उपस्थित होते.
Advertisement