पुणे दि.14: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री श्री विश्वजीत कदम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी राज्यमंत्री श्री रमेश बागवे , राज्याचे समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे ,बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये उपस्थित होते..
अभिवादन कार्यक्रमानंतर राज्यमंत्री श्री विश्वजीत कदम यांनी राज्याचे मुख्यालय असलेल्या समाज कल्याण आयुक्तालयात देखील भेट देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .
Advertisement