पिंपरी, १५ एप्रिल २०२१ :- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक व तातडीची बाब म्हणून ७०५० रेमडेसीवीर इंजेक्शन खरेदी करण्यासाठी येणा-या ४६ लाख ५८ हजार खर्चासह
विविध विकास कामांच्या खर्चासह तरतूद वर्गीकरण, अवलोकनाच्या विषयासह विविध विकास विषयक बाबींसाठी झालेल्या आणि येणा-या एकूण सुमारे ३७ कोटी २ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.
प्रभाग क्र. १८ मधील पार्वती उद्यान, सिल्व्हर ओक, मोरया उद्यान व इतर उद्यानामध्ये कामे करण्याकामी येणा-या ३९ लाख ३८ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली,
प्रभाग क्र. २ चिखली बालघरेवस्ती व पवार वस्ती परिसरात ठिकठिकाणी पेव्हींग ब्लॉक बसविण्याकामी येणा-या ३० लाख ४६ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.५ मधील पेव्हिंग ब्लॉक बसविणे व दुरूस्ती करण्याकामी येणा-या २६ लाख ८ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
फ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कोविड केअर सेंटर (CCC) आणि आयसोलेशन वॉर्ड साठी तात्पुरत्या स्वरुपात जनित्र संच ऑपरेटरसह भाडेतत्वावर वापरण्याकामी येणा-या ३५ लाख ६४ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
मोरेवस्ती चिखली परिसरातील जलनिःसारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याकामी येणा-या ३० लाख ९ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
मे.रुबी अल केअर सर्व्हिसेस प्रा.लि. यांचेकडील अधिकारी व कर्मचारी वर्गाची सेवा महानगरपालिकेकडे अधिग्रहित करुन घेतलेली आहे. त्यांचेकडील उपलब्ध ३० प्रोफेशनल्स व २२८ वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी यांचे दिनांक २९-०३-२०२१ ते दि.२७-०५-२०२१ या अधिग्रहण कालावधीतील वेतनाकरीता येणा-या ९४ लाक ७२ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
पिंपरी चिंचवड मनपाच्या संगणक व सर्व्हर यंत्रणेकरिता आवश्यक Anti-Virus यंत्रणा एका सपोर्ट स्टाफसह ३ वर्षांच्या वैधता कालावधीकरिता खरेदी करण्याकामी येणा-या ३२ लाख ८८ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
मनपाच्या विद्युत विभागाकडील गहुंजे हद्दी लगतच्या डी. पी. रस्त्यापासून देहुरोड रस्त्यापर्यंत १२ मीटर रस्ता विकसित करण्याकामी ९९ लाख ८२ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.५ मधील मनपा इमारतींची व आरक्षणाची किरकोळ दुरुस्तीची व देखभालची कामे करण्याकामी ३० लाख ४० हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
कोरोना विषाणूचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखणेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे करीता ड क्षेत्रिय कार्यालयांतर्गत तात्पुरत्या स्वरूपात विद्युत व्यवस्था करणे व अनुषंगिक कामे करणे कामासाठी येणा-या ४९ लाख ९४ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
इ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्र.३,४,५ व ७ मधील विविध मनपा इमारती, उद्याने व रस्त्यावर आवश्यकते प्रमाणे सी.सी.टी.व्ही यंत्रणा बसवणे व अनुषंगिक कामे करण्याकामी २८ लाख ९१ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
ऑटो क्लस्टर येथे एक्सप्रेशन ऑफ इंन्ट्रेस्टचे अनुषंगाने ५० खाटांचे आय.सी.यु. व १५० खाटांचे ऑक्सीजन बेड कार्यान्वित करण्याकामी येणा-या २ कोटी ५० लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.२३ मधील मनपाचे विविध इमारतींवर सोलर सिस्टिम बसविण्याकामी येणा-या ३३ लाख २० हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथील जम्बो कोवीड सेंटर रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या उपचाराकरीता आवश्यक वैद्यकिय ऑक्सिजन द्रव गॅसचा २ महीन्याकरीता पुरवठा करण्याकामी येणा-या १ कोटी ६४ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. ३२ मधील ममतानगर, नॅशनल स्कूल, प्रियदर्शनीनगर इ. ठिकाणी अंतर्गत भागात व आजूबाजूच्या परिसरात आवश्यकतेनुसार स्थापत्य विषयक व इतर अनुषंगिक कामे करण्याकामी २८ लाख ३० हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृति रूग्णालय व इतर दवाखाने/ रूग्णालयांकरिता तातडीने आवश्यक असलेल्या औषधे साहित्य खरेदीकामी १ कोटी ७० लाख खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.१८ चिंचवड येथील पवनानगर बॅडमिंटन हॉल शेजारील मोकळ्या जागेत स्केटिंग रिंग तयार करण्याकामी येणा-या २८ लाख ५९ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.