शबनम न्युज : पिंपरी चिंचवड (दि.३१ डिसेंबर) :- मा.शरदचंद्ररावजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक सेल पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने ३०/१२/२०२१ रोजी राष्ट्रवादी काँ.पार्टी पक्ष कार्यालय, खराळवाडी, पिंपरी पुणे, येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख उपस्थिती फजलभाई शेख, शेर अली (राष्ट्रीय सर चिटणीस अल्पसंख्याक), ग्लोबल प्लेसमेंटचे चेअरमन शक्रुलाभाई पठाण, माधव पाटील व युनूसभाई शेख. तसेच या मेळावाल्या प्रतिसाद देण्या साठी काही नामवंत कंपन्यानी आपले पदाधिकारी पाठवले होते, सर्वांचे आयोजकांच्या तर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड अल्पसंख्याक सेल अध्यक्ष हाजी युसूफभाई कुरेशी, सरचिटणीस साहूल उर्फ हमीदभाई शेख, महिला कार्याध्यक्ष कमरून्निसा शेख, उपाध्यक्ष जावीदमिया जहागीरदार, सरचिटणीस अशपाक शेख, सल्लागार ॲड. नसीबुनिसा खान, शहाजी आत्तार पटेल, फैज दलाल, हाजी इद्रिस खालु, नजीर भाई सैय्यद, नुर खान (धान्य पुरठा सदस्य), युनूस शेख, चांद अत्तार, अल्ताफ शेख (क्राईम नोट न्यूज), रीहान खान व आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी या मेळाव्याला प्रतिसाद देण्यासाठी काही नामवंत कंपन्याचे पदाधिकारी आले होते.
१) कौनिझंट २) विप्रो ३) एक्सडीनस ४) आयसोन
या मेळावा मध्ये सुमारे १०० -१२५ गरजूनी बेरोजगार उपस्थित होते. त्यांना त्यात चांगले यश मिळाले.
लोकोपयोगी उपक्रम आयोजित केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक सेल पिंपरी चिंचवड शहर पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.