प्रतिनिधी पुणे सुनिल ज्ञानदेव भोसले
मुंबई:बदलापूरचे सुपरिचित निसर्गउपचार तज्ञ डाॅ. प्रविण एस् निचत यांना बाबू जगजीवन राम आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आलेला आहे.देशविदेशातील वैद्यकीय सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या, उद्योग, सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रात अद्वितीय कार्य करणा-या संस्था, व्यक्ती यांना त्यांच्या सामाजिक सेवा कर्मींचा समाजाभिमुख कार्याचा आढावा घेवून या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येते .दरवर्षी आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातात असे महाराष्ट्र राज्य सचिव बाबू जगजीवन राम कला संस्कृती आणि साहित्य अकादमीचे महाराष्ट्र राज्य सचिव प्रा.गोरख साठे बारामती यांनी वार्तालाप करताना कळविले आहे .डाॅ. प्रविण एस् निचत यांना बाबू जगजीवन राम आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे असल्याचे डाॅ. नफेसिंह खोबा दिल्ली यांनी सदर पुरस्कार पत्र पाठवून अभिनंदन केले आहे. येत्या 8 मे 2021रोजी नेपाळ ,लुंम्बीणी येथे बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात केले जाणार आहे. डाॅ. प्रविण एस् निचत यांची बदलापूर येथे होप फाउंडेशन वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारी सेवाभावी संस्था आहे.तथागत बुद्धांच्या पवित्र जन्मभूमी लुंम्बिनी नेपाळ येथे आपला बाबू जगजीवन राम आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव होत आहे हेच आमच्या संघटनेच्या यशाची पावती होय.असे डाॅ. प्रविण एस् निचत यांनी पुरस्कार जाहिर झाल्याने उर्जा व मानसिक कार्यक्षमता सिद्ध झाली आहे असे मत प्रतिपादन केले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहून होप फाउंडेशनचे कार्य समाज सेवेचे कार्या बद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन केले जात आहे.
डाॅ. प्रविण एस् निचत यांना बाबू जगजीवन राम आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व समाज बांधव आणि भगिनी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत
हा पुरस्कार त्यांना त्यांच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमांसाठी मिळालेला आहे. तो उपक्रम असा की ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये निसर्गोपचारचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वाना मोफत टेलिफोनद्वारे सर्वच रोगांवर “घरगुती उपाय” सांगतात. त्याचे ते एकही रुपया आकारत नाही. अशी ही त्यांची आगळी वेगळी समाज भक्ति व निस्वार्थ भावनेने केलेले समाजकार्य गेले कित्येक वर्षांपासून करत आहेत. जवळपास 45,000 पेक्षा जास्त रुग्णांचे उपचार करून आरोग्य निरसन केले आहे. त्यांच्या रुग्णांपैकी काही सीने स्टार,(नट व नट्या) न्यायाधीश, जेलर, पुलिस ऑफिसर, डॉक्टर्स, पत्रकार, शिक्षक व इतर बरेच रुग्ण आहेत. चरक, धन्वन्तरि, मदर टेरेसा असे जवळपास 95 विशेष पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यामध्ये विविध संस्था त्यांचे आरोग्यशिबिर आयोजित करतात.