शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील 45 वर्षाच्या आतील नागरसदस्य ,पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस द्या अशी मागणी करणारे पत्र महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू आहे शहरातील विविध ठिकाणी लसीकरण केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे 1 एप्रिल पासून वय वर्षे 45 पूर्ण असणाऱ्या नागरिकांना covid-19 लस घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे
सध्या covid-19 विषाणूची दुसरी लाट व वाढता प्रादुर्भाव पाहता महापालिकेचे सर्व नगर सदस्य ,शहरातील पत्रकार, 45 वर्षे च्या आतील कोरोना योद्धे , सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना यांचे प्रतिनिधी, व नगर सदस्य , पत्रकार हे सर्व आपापल्या परीने या संकटाचा सामना करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणारे, रुग्णांना, हॉस्पिटल, औषधे तसेच इतर व्यवस्थेसाठी स्वतःच्या आरोग्याची जोखीम पत्करून धावपळ करीत आहे.
या सर्व नागरिकांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून covid-19 लसीकरण करण्यात यावे अशा सूचना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पत्रात नमूद केल्या आहेत