शबनम न्युज / पिंपरी
१ मे पासून पुढील टप्प्यातील लसीकरण सुरू होत आहे. हे लसीकरण गृहनिर्माण सोसायटीमध्येच घेण्यात यावे अशी मागणी मनपा आयुक मा. राजेश पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयुर जयस्वाल , पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे सरचिटणीस चंद्रशेखर जाधव , गौरव चौधरी यांच्या सहीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सरचिटणीस मयुर जयस्वाल यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे कि करोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात लसीकरण जास्तीत जास्त करण्यात येत आहे. यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये ज्येष्ठ नागरिक व दुसऱ्या टप्प्यात वय 45 वर्षापुढील नागरिकांना लस देण्यात आली. काल सरकारने जाहीर केल्याप्रमाणे तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण हे १८ वर्षांपुढील सर्वांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोरोनाच्या लढ्यामध्ये लस हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे. सरकार व प्रशासनाच्या वतीने जास्तीत जास्त लसीकरण करणे यासाठी प्रयत्न आहे. यामध्ये महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी सुरु केलेल्या लसीकरण केंद्रावर हवा तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही. यामध्ये मुख्य कारण मनपा लसीकरण केंद्रावर नागरिक जास्त गर्दी करीत असतील असा समज झाला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे तसेच ज्येष्ठ नागरिक हे जास्त वेळ बसू शकत नसल्याने अनेकजण या केंद्रावर जाणे टाळत आहेत. परिणामी अनेक ठिकाणी लसीकरण कमी झाले व काही ठिकाणी केंद्र बंद करण्याची वेळ आली.
तिसऱ्या टप्प्यातील १ मे रोजी सुरू होणारे लसीकरण हे गृहनिर्माण सोसायटीच्या कम्युनिटी हॉल, ऑफिसमध्ये योग्य नियोजन करून घेतल्यास, सर्वच नागरिकांना सोयीस्कर असल्याने त्यास जास्तीत जास्त प्रतिसाद मिळेल परिणामी शासनाचे उद्दिष्ट पुर्ण होण्यास मदत होईल. तसेच सोसायटीचे मदतनीस व स्वयंसेवकांमुळे प्रशासनावरील ताण देखील कमी होणार आहे.
आपणांस युवक काँग्रेसच्या वतीने या पत्राद्वारे मागणी करण्यात येते की, गृहनिर्माण सोसायटी मध्ये लसीकरण सुरू करण्यात यावे अशी मागणी मयूर जैस्वाल यांनी केली आहे