शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
कोरोना व्यतिरिक्त इतर रुग्णांवर डॉ .डी वाय.पाटील रूग्णालयात मोफत उपचार करावे अशी मागणी करणारे पत्र माजी नगरसेवक जितेंद्र नन्नावरे यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे कि पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाची साथ असल्याने महापालिकेचे वाय.सी.एम.रुग्णालय कोरोनावर उपचार करण्यासाठी समर्पित केले आहे.पूर्वी वाय.सी.एम. मध्ये मोठ्या प्रमाणावर गोरगरीब रुग्ण मोफत उपचार घेत होते परंतु वाय.सी.एम.कोरोना रुग्णांना समर्पित केले असल्याने इतर रुग्ण डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल या ठिकाणी उपचार घेण्यासाठी जातात तेव्हा त्या ठिकाणी सर्वच रुग्णांना पंचवीस हजार रुपये डिपॉझिट भरा तरच ॲडमिट करू असे सांगितले जाते.या ठिकाणी पैसे भरल्याशिवाय उपचार होत नाहीत.शहरात खूप मोठ्या प्रमाणावर गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी कोरोनामुळे महापालिकेची मोफत रुग्णालय उपलब्ध नाहीत. एक वेळ जेवणासाठी संघर्ष करावा लागत आहे त्यातच आजारी पडल्यावर एवढे पैसे आणयचे कोठुन असा प्रश्न सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना पडत आहे याबाबतीत वायसीएम येथे डॉक्टरांशी संपर्क केल्यावर रुग्णांना ससून हॉस्पिटल अथवा औंध हॉस्पिटल येथे घेऊन जा असे सांगितले जाते. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाण्यासाठी वाहन व्यवस्था लोकांना उपलब्ध नाही रुग्णवाहिका व्यवस्थेवर प्रचंड प्रमाणात ताण आहे आणि कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर गोरगरिबांचे हाल होत आहेत. त्यातच आजारी पडल्यावर मोफत उपचार मिळत नसल्याने नागरीकांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. यामुळे आपण आपत्कालीन कायद्याअंतर्गत डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालय ताब्यात घेऊन पिंपरी-चिंचवड शहरातील गोरगरिबांना मोफत उपचार होने बाबत कार्यवाही करावी.