शबनम न्युज / पिंपरी
उद्योगनगरीच्या प्रथम नागरिक महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे नातू कु.ज्ञानेश जवाहर ढोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयुश्री कोविड सेंटर पिंपळे गुरव ह्या संस्थेस 51 हजार रुपयांचा निधी सामाजिक बांधिलकी म्हणून आज सुपूर्द करण्यात आला. स्वतःचा वाढदिवस साजरा न करता आज कोविडच्या प्रादुर्भावामुळे सामाजिक जीवन अस्ताव्यस्त झाले आहे. रुग्णांना मदती करिता आज ढोरे घराण्याचा सामाजिक वारसा पुढे चालविण्यात खऱ्या अर्थाने त्यांचा नातू कु.ज्ञानेश ढोरे याने आपल्या वाढदिवसा निमित्त मागच्या वर्षी प्रमाणे स्वतःकरता कुठल्याही प्रकारचा कपडे वस्तू खरेदी न करता वाढदिवस साजरा न करता सामाजिक दायित्व म्हणून वाढदिवसाच्या खर्चाचे सर्व पैसे व आपल्याकडील पॉकेट मनीतील पैसे असे एकून 51 हजार रुपयांचा निधीचा चेक आमदार लक्ष्मण जगताप व मा.नगरसेवक शंकर शेठ जगताप यांच्या मार्गदर्शनामध्ये आयुश्री कोवीड सेंटर पिंपळे गुरव येथे रुग्णांच्या सेवेकरिता अर्पण केला.
यावेळी महापौर उषाताई उर्फ माई ढोरे, पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीस युवा मोर्चा जवाहर ढोरे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी निम्हण , वैशाली घाडगे, माऊली घोलप, संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.