शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या कार्यकारिणी ची बैठक राष्ट्रवादी पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर कार्यालयात नुकतीचपार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ची शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणी मध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस पदी दिशान मुखर्जी यांची निवड. करण्यात आली सदर निवड विद्यार्थी काँग्रेस चे शहर अध्यक्ष यश साने यांनी केली सदर निवडी चे पत्र राष्ट्रवादी चे शहर अध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते देण्यात आले.
या वेळी शहराध्यक्ष संजोग भाऊ वाघेरे पाटील, राष्ट्रवादी चे शहर उपाध्यक्ष अतिश बारणे,पुणे विभागीय अध्यक्ष संध्याताई सोनवणे, पिंपरी चिंचवड शहर विद्यार्थी अध्यक्ष यश दत्ता काका साने , पुणे जिल्हा प्रभारी सनी भाऊ मानकर आदी मान्य वर उपस्थित होते.
Advertisement