शबनम न्युज | मुंबई
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रकृती बिघडली आहे. अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडले. यानंतर त्यांची डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली. छातीमध्ये दुखत असल्याची तक्रार असल्याने त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अनिल देशमुख हे सकाळी ११ वाजता अचानक चक्कर येऊन खाली पडले. यानंतर तेथील डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली. नंतर जे जे रुग्णालयात नेऊन त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. दोन दिवस त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.
Advertisement