शबनम न्यूज , प्रतिनिधी :
एच. ए . स्कूल , पिंपरी – १९८७ बॅचचे ११ वे ‘ स्नेह संमेलन ‘ रविवार दिनांक २९ – १० – २०२३ रोजी ‘ द क्लोवर ‘ हाॅटेल , चिंचवड स्टेशन येथे आंनदात , उत्साहात , जल्लोषात संपन्न झाले.
जुने मित्र – मैत्रीणीं / माजी विद्यार्थी हे ३६ वर्षे कालावधी नंतर पुन्हा एच. ए. शाळेतील आठवणीत रममाण होऊन एकत्रीत आले . रविवारी सकाळी १० वाजता प्रथम उपस्थित विद्यार्थी मित्र -मैत्रीणींचे स्वागत गुलाब पुष्प देऊन तसेच बॅच लावून करण्यात आले मंदा कंद , संयोगिता लोखंडे , शुभदा कुलकर्णी , सुरेंद्र मोरे ,, सुनील पवार , अजेय निलजकर यांनी केले.
शाळेतील घडलेले संस्कार , शिकवणी प्रमाणेच सकाळी १०-३० वाजता – दिप प्रज्वलन – राहुल गुजर , हेमंत पडगळ , युवराज फाळके , मनोज वाघ , शुभदा कुलकर्णी , पुर्वा ओक यांच्या हस्ते झाले. त्या नंतर
सरस्वती पूजन – अभय पिंपळीकर , लता थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. प्रार्थना , स्वागत गीत – सुषमा काशीकर हिने गायले त्यानंतर नृत्य सादरीकरण – वंदना बडवे , लता थोरात यांनी केले.
शाळेतील आणि मित्र परिवारातील दिवंगत व्यक्तींना , नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सकाळी १०-४५ ते ११-१५ मित्र -मैत्रींणींचे संवाद / भेटी-गाठी त्यानंतर पुन्हा नव्याने झालेला ओळख परिचय करून घेतला.
सकाळी ११-३० प्रास्ताविक , स्वागत भाषण मोहन बाबर यांनी केले. आपल्या मनोगतात एच. ए. शाळेतील बॅच -१९८७ आम्ही सर्व माजी विद्यार्थी , मित्र-मैत्रीणी ३६ वर्षे कालावधीनंतर पुन्हा एकदा मोठ्या संख्येने एकत्रीत आले या बॅचचे हे ११ वे वार्षिक स्नेह संमेलन आहे. यामध्ये देशातील विविध राज्यात राहणारे मित्र -मैत्रीणी सहभागी होतात. अनेक माजी विद्यार्थी नियमितपणे महिन्यातून एकदा भेटत असतात . एच.ए. शाळेला मदत करणे याच उद्देशाने एकत्रीत भेटून चर्चा करतात . तसेच सर्वांच्या सुख-दु:खात सामिल होऊन सर्वाना मदत करीत असतात
शाळे करीता अनेक साहाय्य या बॅच च्या वतीने नेहमी करण्यात येतात
करोना काळात हिंदुस्थान ॲनटीबायोटीकस स्कूल ( एच.ए. ) शाळेतील अनेक गरीब विद्यार्थ्यांची वार्षिक फी शाळेत जमा केली . यापुर्वी शाळेतील खोल्यांचे नवीन रंगकाम करून दिले. शाळेत लोखंडी कपाट आणि प्राथमिक उपचार साहित्य , बेड शाळेला देण्यात आले आहे शाळेतील सज्जा दुरुस्ती करून नवीन बांधकाम , रंगकाम करून दिलेले आहे. तसेच आजी-माजी विद्यार्थी , पालक , शिक्षक आणि शाळेच्या परिसरातील नागरिक यांच्या सहभागाने , सहकार्याने शाळेत तसेच पवना धरण परिसरात तिकोणा किल्ला पायथ्याशी प्लॅस्टिक मुक्त अभियान , वृक्षारोपण , स्वच्छता अभियान राबविण्यात आलेले आहे. तसेच गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि सन्मान देखील दरवर्षी नियमितपणे शाळेत केला जातो. या बॅचचे मित्र स्वर्गीय रणजीत सावंत याचे स्मरणार्थ इयत्ता १० वी चे गुणवंत विद्यार्थी यांना शिष्यवृत्ती रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येतो.
अशाप्रकारे १९८७ बॅचच्या वतीने शाळेला मदत करण्याचा प्रयत्न आज पर्यंत करण्यात आले आहे. . तसेच मित्र -मैत्रीणींना येणाऱ्या समस्या , अडचणी सोडविण्यासाठी सर्वजण मदत आणि सहकार्य करीत असतात.
उपस्थित सर्व मित्र-मैत्रीणींनी आपला संपूर्ण परिचय देऊन आपले मनोगत आणि भावना व्यक्त केल्या. यामध्ये शुभदा कुलकर्णी , अभय पिंपळीकर , राजेश चिटृॆ , राजश्री कलापुरे ( प्राणी मित्र ) , प्रताप सावंत यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यातील मित्रांचे वाढदिवस केक कापून साजरा केला गेला . सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सर्वांनी एकत्रीत ‘ स्नेह भोजन ‘ घेतले.
दुपारच्या सत्रात विविध गुण दर्शन , नृत्य , मराठी , हिंदी चित्रपटातील गाणी गायन झाले. गायक – शैलेश भावसार , राजेश चिटृॆ , सुधीर भोसले , उमाकांत सोनवणे , नितीन सावंत , बापू गायकवाड तसेच गायिका – सोनाली देशपांडे , अनिता जाधव , मनिषा गवळी , सिमा थोरवे , अनुप्रिता वैशंपायन , मंजुषा जोगळेकर , सुषमा सरदेशपांडे , गिता गोटेकर यांच्या गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.
माजी सैनिक मेजर आणि आमचे मित्र सुनील पवार यांनी भारतीय लष्करातील जवानाचे संदर्भात त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर सामुहिक वंदेमातरम घेण्यात आले.
सायंकाळी ५ वाजता उपस्थित सर्व मित्र-मैत्रीणींना आठवणीतील भेट वस्तू देऊन समारोप झाला. संमेलन यशस्वी करण्यासाठी स्थानिक मित्र-मैत्रींणीचे मोठे सहकार्य आम्हाला लाभले. सर्वाचे आभार राजेश चिटृॆ यांनी मानले.
एच.ए.शाळेतील १९८७ बॅचचे माजी विद्यार्थी नियमितपणे भेटून ३६ वर्षेऻ नंतरही शाळेविषयीची आपुलकी , कृतज्ञता , आणि शाळेला मदत करण्याची भावना ठेवूनच अखंडितपणे काम करीत असतात या बॅच ची प्रेरणा इतरांनी घेऊन आपल्या शाळेला आणि गरजू मित्रांना मदत करावी हीच यामागची अपेक्षा असल्या चे या बॅच वतीने सांगण्यात आले