शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे तात्काळ कोरोना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढावे, असे मागणीचे निवेदन माजी विरोधी पक्षनेते, विद्यमान नगरसेवक नाना काटे यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे.
सदर निवेदनात म्हंटले आहे कि, मागील काही दिवसांपासून शहरात कोरोना रुग्ण संख्या कमी होत आहे ही आनंदाची बातमी आहे. मात्र आरोग्य विभागाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. यामुळे शहरातील २० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या जनतेचा विचार करून अधिकाधिक लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आपल्या महापालिकेचे कोविड लसींसाठी ग्लोबल टेंडर काढावे.
शहरात लसींच्या तुटवड्यामुळे दिवसाआड लसीकरण होत आहे. तसेच शहरात कोणत्या ठिकाणी कोणत्या दिवशी लस मिळेल याची याची खात्री नागरिकांना होत नाही. त्यामुळे लोक लसीकरण केंद्रावर विनाकारण गर्दी करतात याचा मोहिमेवर परिणाम होताना दिसत आहे. आता महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी जागतिक निविदा काढण्याची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक आणि तेलंगण यांसह काही राज्यांनी कोरोना लसींसाठी जागतिक निविदा काढण्याचा पर्याय स्वीकारला आहे. कोरोना लसींच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय योग्य वाटतो.
मुंबई महानगरपालिकेने एक कोटी कोरोना लसींची जागतिक निविदा काढली. त्यावरुन विरोधक भाजपकडून राजकारण सुरु केले मात्र याठिकाणी आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात असताना आम्हीच ग्लोबल टेंडर काढण्याची मागणी करत आहे. लसींसाठी जागतिक निविदा काढल्यानंतरही आपल्या शहरात लस पुरवठा मिळाला नाही तर ते अपयश पालिकेतील सताधारी असणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारचे असणार आहे.
तसेचवर्क ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर कंपन्यांना ३ ते ४ आठवड्यात लसींचा साठा द्यावा अशी अट घालवी. त्यांना ICMR आणि DGCI च्या नियमावलीचे पालनही करावे लागेल. देशात कोविड शिल्ड, कोवॅक्सिन, फायझर, मॉडर्ना आणि स्पुटनिक लस देशात उपलब्ध होणार आहेत असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढवण्याचा राज्य सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिकांना लस मिळण्यासाठी महापालिकेने तात्काळ लसींसाठी ग्लोबल टेंडर काढावे,असे हि मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नाना काटे यांनी म्हंटले आहे.